दिल्ली | Delhi
CSK संघाचा फलंदाज सुरेश रैना आयपीएल २०२० मध्ये सहभाग होण्यासाठी दुबईला गेले होता. मात्र तो अचानक मायदेशी परतला. सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला असून संपूर्ण हंगामात तो बाहेर पडला असल्याची माहिती CSK ने ट्विट करून दिली होती.
सुरेश रैना मायदेशी परतण्याचे कारण अद्याप समजलं नव्हतं मात्र एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितनुसार सुरेश रैना यांच्या नातेवाईकांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी रात्री पठाणकोटमधील माधोपूर भागातील थरियाळ गावात अज्ञात लोकांनी सुरेश रैना यांच्या आत्याच्या घरावर हल्ला केला. ज्यात आत्याच्या नवऱ्याची हत्या झाली. तर आत्या गंभीर जखमी झाली. या रिपोर्टनुसार, हा हल्ला १९ ऑगस्टच्या रात्री करण्यात आला होता. तेव्हा हे सर्वजण घराच्या छतावर झोपले होते. त्याचवेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश रैना याच्या वडिलांची बहीण आशा देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे या घटनेत सुरेश रैनाच्या आत्याचे पती अशोक कुमार (वय ५८) यांचा मृत्यू झाला असून सुरेश रैनाचा आत्येभाऊ कौशल कुमार (वय ३२) आणि अपिन कुमार (वय २४) यांनाही गंभीर दुखापत झाली होती.