Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसहा महिने वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू; वन विभागाकडून अंतिम संस्कार

सहा महिने वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू; वन विभागाकडून अंतिम संस्कार

हतगड | प्रतिनिधी Hatgad

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील माणी येथील जंगला लगतच्या नियत क्षेत्रातील कन्या शासकीय आश्रम शाळा माणी लगतचे शेतमालक रामदास सिताराम चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४६ मध्ये अवघे सहा महिने वयाच्या बिबटचा मृत्यू झाल्याचे सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने तात्काळ या बाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली.

यावेळी नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक कृष्णा भंवर, सहाय्यक उपवनसंरक्षक उमेश वाघ,वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता दोन बिबटचे पाऊलाचे ठसे/पगमार्क आढळून आले. जंगलात वन्यजीव यांच्या अधिवासाच्या हद्दी ठरलेल्या असतात. या वरुन दोन नर बिबट आमने सामने आले असावेत. दोघांमध्ये भांडण झाले असावे.आपल्या अधिवास हद्दीत दुस-याने प्रवेश केल्याने प्रथम दर्शनी वन्यजीव अधिवास वर्चस्ववादी लढाईत सहा महिने वयाच्या एका नर बिबटचा मृत्यू झाला असावा असा अंदाज सुरगाणा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळी पंचनामा झाल्यावर शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाला नंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला हे उजेडात येईल.खोकरविहीर, तातापाणी पिंपळसोंड, सोनगीर, कुकूडणे, रघतविहीर, मांधा, खुंटविहीर, करंजुल,हडकाईचोंड,केम पर्वत या जंगलातील भागात बिबट्यांचा वावर वाढला असून लक्षणीय संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे.

मृत बिबट्यावर वनपरिक्षेत्र कार्यालय सुरगाणा येथील आवारात अग्नी दहनाने अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर,सहाय्यक वनसंरक्षक उमेश वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर,माणी बियाणे वनसंरक्षक सावित्री राठोड,सुमन गायकवाड, तुकाराम चौधरी, हरी गायकवाड, भटू बागुल,वनपाल सुनील पवार,भुषण भोये,हेमराज महाले,सह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या