मुंबई | Mumbai –
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने(एनसीबी) सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला
अटक केली असून दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान , सॅम्युअल मिरांडा हा जैद विलात्राकडून ड्रग्ज विकत घ्यायचा, अशी माहिती एनसीबीच्या हाती लागली होती. त्यानुसार मुंबईत सॅम्युलच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू करुन त्याला ताब्यात घेतले. तर एनसीबीच्या पथकाने रिया चक्रवर्तीच्या घराची झाडाझडती केल्यानंतर शोविक चक्रवर्तीलाही ताब्यात घेतले. यावेळी रियाच्या घराची एन्ट्री-एक्झिट, पार्किंग एरिया, गार्डन एरिया, पटांगण आणि खिडक्या यांची एनसीबीकडून रेकी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शोविकच्या घरी एनसीबीच्या पथकाला एक डायरी मिळाली आहे.
शोविक आणि सॅम्युअलच्या अटकेमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणार्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.
शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत.