Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजनसुशांतसिंह आत्महत्या; यशराज फिल्मच्या मालकाची चार तास चाैकशी

सुशांतसिंह आत्महत्या; यशराज फिल्मच्या मालकाची चार तास चाैकशी

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या; सीबीआय चौकशी नाही

मुंबई : Mumbai

- Advertisement -

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant singh) आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आज बॉलिवूडचे प्रख्यात निर्माते आणि यशराज फिल्म्सचे सर्वेससर्वा आदित्य चाेप्रा (Adity Chopra) यांची आज पोलिसांनी साडेचार तास कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून असंख्य प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. वृत्तसंस्था एएनआयनुसार वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये त्यांची सुमारे साडेचार तास चौकशी करण्यात आली.

पाेलिसांच्या चाैकशीत आदित्य चोप्रा यांनी काय म्हटले आहे, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. सुशांतने प्रॉडक्शन हाऊसबरोबर तीन चित्रपट साईन केल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. तेव्हा यश राज यांचे नाव या प्रकरणात आले. हे चित्रपट फ्लोरवर येण्यापूर्वीच बंद करण्यात आले होते. सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा, सुशांतच्या घरातील स्टाफ, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, गर्लफ्रेंड, को-स्टार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. फिल्ममेकर संजय लीला भंन्साली यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तर शेखर कपूरने आपले वक्तव्य मेल केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जीएसटी संकलनात मोठी वाढ

0
नवी दिल्ली ।प्रतिनिधी New Delhi मार्चमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ९.९% वाढून १.९६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले, जे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन...