मुंबई
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे नातू पार्थ यांच्या सुशांत सिंह प्रकरणात सीबीआय चौकशीच्या वादाला उसंत मिळत नाही तोच काँग्रेसचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या वादात उडी घेतली आहे. केंद्राला वाटत असेल तर सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशी करावी असे विधान अस्लम शेख यांनी केल्याने आता नवा वादंग सुरू झाला आहे. शेख यानी म्हटले आहे की, या प्रकरणी काहीजण माध्यमांसमोर यायला मिळते म्हणूज वाद निर्माण करत आहेत. टाळेबंदी असल्यामुळे शूटिंग नाही, काम नाही म्हणून काहीजण वक्तव्य करत आहेत. मुंबईतील धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असेही अस्लम शेख यांनी दिली आहे.
मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत अस्लम शेख यांच्या दालनात बैठकीनंतर अस्लम शेख बोलत होते. या बैठकीला वेगवेगळ्या मशिदीचे विश्वस्त उपस्थित होते. ऐतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी फर्ज नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरामध्ये चालू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रिये अंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत सरकार गांभिर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.