Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजनसुशांतची एक्स मॅनेजर दिशावर सामूहिक बलात्कार

सुशांतची एक्स मॅनेजर दिशावर सामूहिक बलात्कार

मुंबई –

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक खुलासा केला आहे. दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर

- Advertisement -

सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने न्यूज नेशन या वृत्तवाहिनीकडे केला. त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असंही त्याने सांगितलं.

पार्टीमध्ये एकूण सहा जण उपस्थित होते. दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित होता. चार जणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती, अशी धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

दिशाचा 8 जून रोजी मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्यात दिशाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी मृत्यूची चौकशी सुरू केली. दिशाबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दिशाच्या मृत्यूनंतर एका आठवड्यानंतर 14 जून रोजी सुशांतचा मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Kumbh Mela : मुकणेतून अतिरिक्त पाणी आणणार; त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन जलशुद्धीकरण...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) नियोजनासाठी प्रशासनाने आता विषयनिहाय सखोल चर्चा करण्यावर भर दिला असून, सिंहस्थात आवश्यक असणारा पाणीप्रश्न आणि...