नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पत्ता विचारण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या ४९ वर्षीय संशयितास (Suspect) युनिट एकने गजाआड केले आहे. अटक (Arrested) केलेला संशयित स्विगीचा फूड डिलिव्हरी बाॅय असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे २४ तासांत त्याला पकडण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर
फारूख मोहंमद पठाण (वय-३९, रा. श्रमिक हौसिंग सोसायटी, राजीवनगर, नवीन सिडकाे) असे संशयित नराधमाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पाेलीस काेठडी (Police Custody) सुनावली आहे. घटेनेतील पीडिताही (दि.२३) राेजी रात्री सव्वानऊ वाजता पंचवटीतील लामखेडे मळा परिसरातून घरी जात हाेती. त्याचवेळी माेपेडवरुन आलेल्या संशयिताने तिच्याजवळ माेपेड थांबवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला. तसेच तिला जवळ ओढून घेतले, यानंतर ताे पळून गेला.
हे देखील वाचा : Nashik Crime News : मद्यधुंद चालकाने उडवल्या तीन गाड्या; पोलिसांनी काही तासांत घेतले ताब्यात
घटनेनंतर पंचवटीत अल्पवयीन (Minor) पीडितेने फिर्याद दिल्याने भा. न्या. सं. कलम ७४ आणि पाेक्साेअन्वये गुन्हा दाखल झाला. संवेदनशील गुन्हा असल्याने तत्काळ तपास सुरु झाला. त्यात पथकाने सीसीटीव्ही तपासानुसार संशयिताची ओळख पटविली. युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक हेमंत ताेडकर व पथकाने नवीन सिडकाे परिसरातून पठाण यास ताब्यात घेतले. त्याचा ताबा पंचवटी पाेलिसांकडे (Panchvati Police) साेपविला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा