Friday, May 23, 2025
Homeक्राईमCrime : युवकाच्या खून प्रकरणी संशयित आरोपी ताब्यात

Crime : युवकाच्या खून प्रकरणी संशयित आरोपी ताब्यात

 

- Advertisement -

 

 

येवला  | प्रतिनिधी Yeola

येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत सत्यगाव ते महालखेडा रोडलगत असलेल्या ऊसाचे शेतात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मयत युवक हा दहिवाडी, ता. सिन्नर येथील संतोष दत्तात्रय शेळके, वय २७ याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. यातील मयतास अज्ञात आरोपीने डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले, म्हणून येवला तातुका पोलीसात गुरं २०७| २०२५ भान्या.सं.कलम ९०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीकक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांनी घटनेचा आढावा घेवुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी तपास पथकांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीशक रवींद्र मगर व येवला तालुका पो.स्टे. वे पोनि संदिप मंडलीक यांवे पथकांनी घटनारथळावी बारकाईने तपास केला.

स्थानिक गुन्हे शाखेने संशयित विशाल रतन बागले, वय १९, रा. चासनळी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर व गणेश भगवान सोनवणे, वय २५, रा. चासनळी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल वौकशी केली असता, त्यांनी दोघांनी मिळून घटनेच्या दिवशी रात्री मयतास एकांतात घेवुन त्याचे डोक्यात दगड टाकुन, अंगावर दगडाने जबर दुखापत करून जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली.

खुनाचा गुन्हा पूर्व वैमनस्यातून केला असल्याचे तपासात समोर आले असून संशयित आरोपीना गुन्हयाचे पुढील तपासकामी येवला तालुका पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मतदारांच्या सोयीसाठी मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या...