Wednesday, June 26, 2024
HomeनाशिकSinnar News : मालकाच्या सतर्कतेमुळे ट्रॉली चोरणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

Sinnar News : मालकाच्या सतर्कतेमुळे ट्रॉली चोरणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

वावी | वार्ताहर | Vavi

- Advertisement -

सिन्नर तालुक्यातील (Sinnar taluka) मलढोण येथील शेतकऱ्याच्या (Farmer) ट्रॅक्टरची ट्रॉली चोरणारा फरार झालेला संशयित (Suspect) ट्रॉली मालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या (Police) ताब्यात सापडला आहे. मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास ट्रॉली चोरून नेणाऱ्या चोरट्याचा प्लॅन मालकाच्या सावधानतेने फसल्याने तो काही अंतरावर ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून फरार झाला….

Ind vs Pak : राखीव दिवशीही भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास काय होणार? काय असेल समीकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, मलढोण शिवारात (Maldhon Shiwar) समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) बाजूस वास्तव्यास असणारे वामन राजाराम सरोदे यांची निळ्या रंगाची ट्रॉली ही शेजारीच असणाऱ्या ज्ञानदेव डूबे यांच्या वस्तीवर लावलेली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास डूबे यांना ट्रॉली कोणीतरी घेऊन जात असल्याचा संशय आला व त्यांनी तात्काळ त्या रात्रीला वामन सरोदे यांना फोनवरून संपर्क साधला. मात्र, तोपर्यंत ट्रॉली चोरणाऱ्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर आणून ट्रॉलीला जोडून ट्रॉलीसह पोबारा केला होता.

Maratha Reservation : “त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन…”; मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना आवाहन

यानंतर डुबे आणि सरोदे यांनी मोटारसायकलवरून पाठलाग करत ट्रॉली जवळ पोहोचताच संशयित चोरट्याने समृद्धी महामार्गाच्या सर्व्हिस रोडला असणाऱ्या संरक्षण भिंत तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीसह आदळल्याने तो ट्रॅक्टर भिंतीमध्ये अडकल्याने चोरट्याच्या आपल्या मागे कोणीतरी पाठलाग करत आल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो ट्रॉली व ट्रॅक्टर तेथेच सोडून समृद्धी महामार्गाने पळून जाण्यास यशस्वी ठरला. मात्र, सरोदे यांच्यासह ग्रामस्थांनी रविवारी सकाळी युरो ४७ कंपनीचा निळ्या कलरच्या ट्रॅक्टरच्या वर्णनावरून फोन करून संशयिताचा तपास काढला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Weather Update : राज्यात पावसाची पुन्हा विश्रांती? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

दरम्यान, ट्रॅक्टर व ट्रॉली ही वावी पोलीस ठाण्यात जमा असून ट्रॉली (अंदाजे किंमत ७५००० रुपये) चोरणारा संशयित हा वावी गावचा अल्पवयीन मुलगा असल्याचे समजते. याप्रकरणी वावी पोलिसांनी वामन राजाराम सरोदे यांच्या फिर्यादीवरून संशयितावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. आहेर, के.एस. सोनवणे यांच्यासह पो.ह. देविदास माळी, भास्कर जाधव हे त्या अल्पवयीन चोरट्याचा कसून तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Cabinet Expansion : राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार?; भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट, कुणाला मिळणार संधी?

- Advertisment -

ताज्या बातम्या