Saturday, September 14, 2024
HomeनाशिकNashik Crime News : शिंगाडा तलाव राड्यातील संशयितांची कारागृहात रवानगी

Nashik Crime News : शिंगाडा तलाव राड्यातील संशयितांची कारागृहात रवानगी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शुक्रवार (दि.७) रोजी दुपारच्या सुमारास शिंगाडा तलाव (Shingada Lake) येथील कार डेकॉर व्यावसायिक आणि कारागिरांमध्ये झालेल्या वादानंतर मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) दोन्ही गटाच्या एकूण २१ संशयित आरोपींसह सुमारे १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तारुखेडलेतील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला सोन्याचा भाव; पाच एकरमधील शेतमालाला १४ लाखांची बोली

त्यानंतर आज सर्व संशयितांना (Suspects) न्यायालयात (Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे संशयितांची रवानगी कारागृहात (jail) करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास आता गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ला (Crime Branch Unit No.1) देण्यात आला आहे.

मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; सिल्लोड न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित राहुल राऊत, मनोज राऊत, उमेश राऊत, प्रभाकर डेकोरचे मालक प्रवीण, विनोद थोरात, कौशल्य वाकरकर, तुकाराम राठोड, चावी बनविणारा अहमद, नाजिम पिरजादे, अन्वर शेख, अज्जू मामू ऊर्फ अजहर, परवेज निसार शेख, मोबिन, जैनुल अबेदिन सलाउद्दीन मौलवी, अरबाज, दानिश, सोयब, फरहान, शाहरुख, प्रेम, अश्पाक व त्याचे दहा ते पंधरा अनोळखी साथीदार (सर्वांचे पूर्ण पत्ते माहीत नाहीत) यांनी कार डेकोरचे मालक व कामगार यांच्यातील वादावरून गैरकायद्याची मंडळी जमवून हातात तलवार, कोयते, बांबू यासारखी हत्यारे घेऊन दगडफेक व शिवीगाळ केली.

Rain Update : पुढील तीन ते चार तासात राज्यातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता; नाशिकचं काय?

तसेच प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून एकमेकांवर हल्ला (Attack) केला. त्यामुळे पोलिसांनी (Police) सार्वजनिक शांततेचा भंग करून जमावबंदी व हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत सर्व संशयितांना ताब्यात घेतले होते. तसेच परिसरात देखील शांतता प्रस्थापित केली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना झाली नाही. यानंतर आता या घटनेचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Cabinet Expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार

- Advertisment -

ताज्या बातम्या