मुंबई | Mumbai
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात (Murder Case) माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) मास्टरमाईंड असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराडचे थेट चित्रपट सृष्टीशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड फिल्म प्रोड्यूसर होता? असा दावा (Claims ) बीडमधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. याबाबतचे काही फोटो रणजीत कासले यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यात बीकेसीमधील प्रॉडक्शन ऑफिसचे फोटो त्याबरोबरच आयकार्डचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.
तसेच या आयडी कार्डवर इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर (Indian Motion Picture Producer) असोसिएशनचा वाल्मिक कराड एक सभासद असल्याची नोंद आहे. या कार्डवर वाल्मिक कराड बी आर जे फिल्म प्रोडक्शनचा आजीवन सभासद असल्याची नोंद असून त्याचा मेंबर नंबर २३४८० असा असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, रणजीत कासले (Ranjit Kasale) यांनी वाल्मिक कराडबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्याने मोठी खळबळ माजली आहे. तर वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर असल्याचे आयकार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बीड (Beed) पोलीस देखील चक्रावले आहेत.