Tuesday, November 19, 2024
HomeUncategorized33 बंधारे कामांची स्थगिती उठवली

33 बंधारे कामांची स्थगिती उठवली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील सिंचनाच्या 20 कोटी 82 लक्ष रुपयांच्या 33 सिमेंट काँक्रीट बंधार्‍यांच्या कामांची स्थगिती उठविण्यात आली. त्यामुळे येवला तालुक्यातील या 33 गेटेड सिमेंट काँक्रीट बंधार्‍यांच्या कामाची लवकरच सुरुवात होऊन येवला तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण 33 गेटेड सिमेंट काँक्रीट बंधार्‍यासाठी 20 कोटी 82 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. या कामांना स्थगिती देण्यात आल्याने ही कामे थांबली होती. मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा पाठपुरावा करून या कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे.

यामध्ये येवला तालुक्यातील खरवंडी 1 बंधार्‍यासाठी 55 लक्ष 40 हजार, खरवंडी 2 बंधार्‍यासाठी 61 लक्ष 79 हजार, खरवंडी 3 बंधार्‍यासाठी 61 लक्ष 34 हजार तर खरवंडी 4 बंधार्‍यासाठी 58 लक्ष 80 हजार, खरवंडी 7 बंधार्‍यासाठी 62 लक्ष 6 हजार, खरवंडी 8 बंधार्‍यासाठी 68 लक्ष 26 हजार, खरवंडी 9 बंधार्‍यासाठी 56 लक्ष 66 हजार, खरवंडी 10 बंधार्‍यासाठी 75 लक्ष 9 हजार, खरवंडी 11 बंधार्‍यासाठी 62 लक्ष 33 हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.

रहाडी 3 बंधार्‍यासाठी 66 लक्ष 25 हजार, रहाडी 4 बंधार्‍यासाठी 70 लक्ष 44 हजार, रहाडी 5 बंधार्‍यासाठी 66 लक्ष 71 हजार, रहाडी 6 बंधार्‍यासाठी 58 लक्ष 79 हजार, रहाडी 7 बंधार्‍यासाठी 44 लक्ष 6 हजार, रहाडी बंधार्‍यासाठी 59 लक्ष 67 हजार, रहाडी 9 बंधार्‍यासाठी 60 लक्ष 56 हजार, रहाडी 10 बंधार्‍यासाठी 65 लक्ष 63 हजार, ममदापूर 1 बंधार्‍यासाठी 60 लक्ष 8 हजार, ममदापूर 2 बंधार्‍यासाठी 60 लक्ष 16 हजार, ममदापूर 3 बंधार्‍यासाठी 62 लक्ष 6 हजार, ममदापूर 10 बंधार्‍यासाठी 60 लक्ष 42 हजार, ममदापूर 11 बंधार्‍यासाठी 50 लक्ष 61 हजार, ममदापूर 12 बंधार्‍यासाठी 48 लक्ष 70 हजार, ममदापूर 13 बंधार्‍यासाठी 66 लक्ष 27 हजार, ममदापूर 14 बंधार्‍यासाठी 53 लक्ष 57 हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

तसेच सोमठाण जोश 5 बंधार्‍यासाठी 70 लक्ष 10 हजार, सोमठाणजोश 6 बंधार्‍यासाठी 62 लक्ष 75 हजार, सोमठाणजोश 7 बंधार्‍यासाठी 52 लक्ष 6 हजार, सोमठाण जोश गावठाण 8 बंधार्‍यासाठी 69 लक्ष 2 हजार, सोमठाण जोश 9 बंधार्‍यासाठी 57 लक्ष 26 हजार, चांदगाव 1 बंधार्‍यासाठी 72 लक्ष 87 हजार, चांदगाव 2 बंधार्‍यासाठी 77 लक्ष 84 हजार तर अनकाई बंधार्‍यासाठी 93 लक्ष 65 हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या जलसंधारणाच्या विकासकामांमुळे येवला तालुक्यातील सिंचन क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या