Thursday, February 5, 2026
Homeक्राईमCrime News : संशयाच्या कारणातून पत्नीला मारहाण

Crime News : संशयाच्या कारणातून पत्नीला मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

निंबोडी (ता. अहिल्यानगर) येथील जयमल्हार हॉटेलजवळ राहणार्‍या एका महिलेला तिच्या पतीने लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत महिला जखमी झाली असून तिने रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर सोमवारी (2 जून) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनिषा समीर पानपाटील (वय 29) असे जखमी महिलेचे नाव आहे. समीर वसंत पानपाटील याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही घटना 8 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता घडली. पीडिताच्या फिर्यादीनुसार, समीर याने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने तोंडावर आणि डाव्या हातावर वार करत गंभीर दुखापत केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार जयश्री फुंदे करीत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...