Monday, June 24, 2024
Homeजळगाव‘त्या’ तरुणाचा आजारपणामुळे नव्हे, गळफास घेतल्यानेच मृत्यू

‘त्या’ तरुणाचा आजारपणामुळे नव्हे, गळफास घेतल्यानेच मृत्यू

स्मशानभूमीतील मृतदेह पोहचला थेट रुग्णालयात

- Advertisement -

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील मेहरुण येथील योगेश वसंत अत्तरदे (वय-40) यांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. अंत्यसंस्काराप्रसंगी गळ्यावर व्रण दिसून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त होवून सरणावर ठेवलेला मृतदेह स्मशानभूमितून थेट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता.

शवविच्छेदनात अहवालातून गळफास घेतल्यानेच योगेश अत्तरदे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांना माहिती न देताच करत होते अंत्यसंस्कार

मंगळवारी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. परिणामी आता पुन्हा पोलिसांना सांगीतले..तर, उगाच शवविच्छेदन होवून गंभीर आजाराबाबत इतरांना माहिती होवून आई ऐकटीच असून तिला नाहक त्रास सहन कराव लागेल म्हणून त्या पेक्षा झालं गेल पार पडले म्हणत नातेवाईकांनी थेट मृतदेह स्मशानभूमित हलवून अंत्यस्काराची तयारी केली होती.

मृतदेह मेहरुणच्या स्मशानभूमीत नेल्यावर मयत योगेश याच्या पत्नीकडे काही लोकांनी चेहरा उघडून दाखवण्याची मागणी केली असता, त्यास भावाने विरोध दर्शविला. त्यामुळे इतरांचा संशय बळावला होता.

पत्नीच्या आग्रहामुळे चेहरा उघडला असता योगेशच्या गळ्यावर फाशी दिल्याचे व्रण दिसून आले. यानंतर स्मशानभूमित गोंधळ होवून प्रेत जिल्हा रुग्णालयात आणले गेले.

दुर्धर आजाराने ग्रासले होते, गळफास घेतला

मेहरुण येथील रहिवासी योगेश वसंत अत्तरदे (वय-40) यांना अनेक दुर्धर आजाराने ग्रासले होते. परिणामी ते, काही महिन्यांपुर्वी घर सेाडून निघून गेले होते.

साधारण दहा दिवसांपुर्वीच ते घरी परतले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होवुन पाच दिवसांपुर्वीच त्यांना डीस्चार्ज देण्यात आला हेाता.

पत्नी सपना माहेरी गेल्या असतांना योगेशची देखभाल त्याची आईच करत करत होती. काल संध्याकाळी आईने त्याला खायला दिले व त्या बाथरुमला गेल्या असतांना

योगेशने नायलॉन दोरी गळ्याभवती आवळून सोफ्याला बांधत गळफास घेतला. तसाच तो, खाली पडून असतांना त्याची आई व चुलत्यांनी त्याला बघीतले. डॉक्टरांनी डीस्चार्ज देतांनाच गंभीर आजार असल्याने योगेश काही दिवसांचा पाहुणा असल्याचे संकेत दिले होते.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद;आज बुधवारी सकाळी त्याच्यावर शवविच्छेदन

होवुन शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला यात योगेशने गळफास घेतल्याचा त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पश्चात पत्नी सपना आई भाऊ व मुलगी असा परिवार आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरिक्षक विशाल वाठोरे करीत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या