Friday, May 24, 2024
HomeUncategorizedSuzuki ची Jimny भारतातच बनणार; जाणून घ्या वैशिष्ठे

Suzuki ची Jimny भारतातच बनणार; जाणून घ्या वैशिष्ठे

दिल्ली | Delhi

जपानी कार उत्पादक कंपनी सुझुकी त्यांची पाच दरवाजे असलेली सुझुकी जिम्नी एसयूव्ही (Suzuki SUV Jimny) फक्त भारतात उत्पादीत करणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने हे मोठे पाऊल कंपनीने उचलेले आहे.

- Advertisement -

कंपनीच्या गुरुग्राम(Gurugram) येथील कारखान्यात ही एसयूव्ही तयार केली जाणार आहे. या एसयूव्हीच्या उत्पादनासाठी भारत हे कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग हब असेल असे रिपोर्ट आहेत. त्यासाठीची तयारी सुरु झाली आहे.

सुरवातीला थ्री डोर जिम्नीसाठीचे सुटे भाग आयात करून ही गाडी भारतात असेम्बल केली जाणार आहे पण २०२२-२३ पासून कंपनी पाच दरवाजे असलेल्या जिम्नीचे उत्पादन भारतात सुरु करणार आहे.

त्यासाठी स्थानिक व्हेंडर्स बरोबर गेले सहा महिने चर्चा सुरु आहेत. सुझुकी जिम्नी (Suzuki Jimny) ही ऑफरोड एसयूव्ही आहे त्यामुळे तिचा ग्राउंड क्लिअरन्स जादा आहे. राउंड हेडलँप, फॉग लँप यामुळे तिचा लुक आकर्षक बनला आहे.

भारतात बनणाऱ्या एसयूव्हीना टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्यूल सेन्सर ब्रेक सपोर्ट असे फिचर्स दिले जातील. या एसयूव्हीला १.२ लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल. बी ६ एमिशन नॉर्मसह ही एसयुव्ही असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या