मुंबई | Mumbai
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Sanghatana) लवकरच फूट फडणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असून यादरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी आपण दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच काम करत राहणार असल्याची भुमिका मांडली आहे. रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यात (Buldhana) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.
मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरु आहेत. त्या अफवा थांबवाव्यात असेही तुपकर यावेळी म्हणाले. शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या शिस्तपालन आणि कोअर समितीची आज पुण्यात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला रविकांत तुपकर उपस्थित राहणार नाहीयेत. यादरम्यान त्यांनी राजू शेट्टी यांच्या कानावर मी माझी नाराजी घातली असल्याचे म्हटले आहे.
Sanjay Raut : “लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार”; संजय राऊतांचे विधान
दरम्यान, “आजची बैठक रविकांत तुपकर यांनी उपस्थित केलेल्या तक्रारीबद्दल बोलावण्यात आली आहे. तुपकरांनी संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे किंवा माझ्याकडे नाराजी व्यक्त केली नाही. मी माध्यमाच्याद्वारे सर्व ऐकत आहे. बैठकीत येऊन तुपकर यांनी आपलं मत मांडायला हवं. माझ्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप असतील तर, मी समितीच्या बैठकीत असताना किंवा नसताना भूमिका मांडता येते.”
मला संघटनेत राहूनच शेतकरी चळवळीचं काम करायचे आहे. माझ्या दृष्टीने शेतकरी माझा आत्मा, माझा प्राण आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहायचे आहे. हा निर्णय मी घेतला असून आजपासून मी कामाला लागसो आहे असे रविकांत तुपकर म्हणाले. माझे आक्षेप, नाराजी आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे दुखणे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट नाही; शरद पवार गटाचा निवडणूक आयोगाकडे युक्तिवाद
पुढे ते असे ही म्हणाले की, ते पुन्हा-पुन्हा कितीदा सांगायचे. हे मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे याबद्दल सकारात्मक निर्णय आणि अंमलबजावणी राजू शेट्टी यांनी करावी असेही तुपकर म्हणाले आहेत.
यावर राजू शेट्टी यांनी सांगितले, “संघटनेच्या अंतर्गत समिती आहे. त्या समितीच्या समोर येणार नाही, हा अहंकार बरोबर नाही. मी स्वत: समितीच्या समोर येण्यास तयार आहे. माझ्याबद्दल आक्षेप असतील, तर मी समितीच्या बैठकीला येणार नाही, असेही सांगितले.”
यावर बोलताना तुपकर म्हणाले, “मला अजिबात अहंकार नाही आहे. मी जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. अशा बैठका अनेकदा झाल्या आहेत. समितीच्या सदस्यांकडे अनेकदा माझे मत मांडले आहे. माझ्या मताची दखल घेतली असती, तर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोललो नसतो. बैठकीला आलो नाही, म्हणजे अहंकारी आहे, असे होत नाही.”