Tuesday, March 25, 2025
Homeनगरजिल्ह्यात आजपासून स्वच्छ माझं अंगण अभियान

जिल्ह्यात आजपासून स्वच्छ माझं अंगण अभियान

अभियान कालावधी 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वच्छतेबाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी आता कुटुंब स्तरावर स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून यात उत्कृष्ट स्वच्छता असणार्‍या कुटुंबांचा ग्रामपंचायतकडून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

- Advertisement -

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन, राबवत असलेले राज्यातील सर्व कुटुंब स्तरावर याची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नित्यनियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय सांडपाणी व्यवस्था करता शोषखड्डा, परसबाग, पाझरखड्डा घनकचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंब स्तरावर कचरा कुंड्यांचा वापर करतात, अशा कुटुंबांना प्रोत्साहन देणे आणि आणि त्यांचे अनुकरण अन्य लोकांनी करावे, यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.

अभियानाची माहिती/ सूचना गावात दवंडी ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सोसायटी कार्यालय, तलाठी सज्जा या ठिकाणच्या सूचना फलकावर 31 ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणार्‍या ग्रामस्थांनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जलजीवन प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...