Tuesday, May 21, 2024
Homeधुळेस्वामी नारायण मंदिर रोडवरील लुटीचा छडा लागला

स्वामी नारायण मंदिर रोडवरील लुटीचा छडा लागला

धुळे – प्रतिनिधी dhule

शहरातील देवपूर भागातील स्वामी नारायण मंदिर (Swami Narayan Temple) रोडवरील श्रीराम चौकातील तरूणाच्या लुटीच्या गुन्ह्याची देवपूर पोलिसांनी (police) उकल केली आहे. एकाला अटक केली असून त्याच्याकडून तरूणाची हिसकावलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

- Advertisement -

त्यान गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या फरार साथीदाराचाही शोध घेण्यात येत आहे. देवपूरातील बिलाडी रोडवरील एकता नगरात राहणारे योगेश सुकलाल निकम (वय ४३) हे दि.७ जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीने (क्र.एम.एच.१८ ए.एम.३६७९) स्वामी नारायण मंदीर रोडवरील श्रीराम चौकाजवळुन घरी जात होते. त्यादरम्यान त्यांना मागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अडविले. कारण नसंताना शिवीगाळ करुन गालावर चापट मारली. तसेच त्यांच्या खिशातील २ हजार रुपये रोख व एटीएम, पॅनकार्ड, आरसीबुक असे ठेवलेले पाकीट व त्यांची दुचाकी देखील जबरीने हिसकावुन पळुन गेले.

याप्रकरणी दि.१३ रोजी देवपूर पोलिसात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने गुन्हयाचा तपास सुरू केला. त्यादरम्यान हा गुन्हा अक्षय सुरेश चव्हाण (रा.दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, देवपुर) याने त्याचा साथीदार अविनाश ऊर्फ गोल्या युवराज बोरसे याच्या मदतीने केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शोध पथकाने अक्षय चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार गोल्या बोरसे याच्या सोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हयातील फिर्यादीची दुचाकी जप्त करण्यात आली. गुन्हयातील दुसरा आरोपी अविनाश बोरसे हा अद्याप फरार असुन त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे व सहाय्यक पोलीस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम तसेच पोसई राजेश इंदवे, राजेंद्र माळी, पोहेकॉ मिलींद सोनवणे, योगेश कचवे, पोना शशींकात देवरे, पोकॉं मुकेश वाघ, किरणकुमार साळवे, सुनिल गवळे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या