Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची नांदी! ‘या’ बड्या नेत्यांमध्ये बैठक

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची नांदी! ‘या’ बड्या नेत्यांमध्ये बैठक

मुंबई । Mumbai

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. अशातच राज्याच्या राजकारणात अजून एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यात तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी पुढाकार घेतला आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली . स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व इतर छोट्या पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मविआ असो किंवा महायुती असो जे राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्राला आवडणारं नाही. बच्चू कडू परखड व्यक्तीमत्व आहेत. आम्ही एकत्र यायला लागलोय चर्चा सुरु आहे. मनोज जरांगेशी पण भेट घेतली सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्राला एक चांगला पर्याय महाराष्ट्राला देण्यासाठी चर्चा सुरु आहेत. मी कोणाच्या सोबत नव्हतो. सगळ्यांसाठी आमची दार उघडी आहेत. कॉमन मिनिमम अजेंडा घेऊन आमच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आमचं अस्तित्व आगामी विधानसभा निवडणुकीत असेल.

हे हि वाचा : आषाढ आणि श्रावणसरींनी मिटवली; नगर-नाशिककरांची समन्यायीची चिंता!

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हेदेखील तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी ‘वंचित बहुजन आघाडी’ च्या माध्यमातून त्यांनी स्वत:चं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामाध्यमातून त्यांनी दलित, बहुजन समाजासह अठरापगड जातींना वंचितच्या छताखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर 2024 च्य लोकसभा निवडणुकीपूर्वीही राज्यात तिसऱ्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या. पण यावेळीही त्यांच्या तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नाला फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नाही.

हे हि वाचा : भाजपाला धक्का? शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची सुचक प्रतिक्रिया

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...