टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
येथील ग्रामसचिवालयाच्या सभागृहात लावलेली माजी आ. स्व. जयंतराव ससाणे (Swargavas Jayantrao Sasane) यांची प्रतिमा (Image) गेल्या काही दिवसांपासून गायब (Disappeared)असल्याबाबतचे वृत्त दै. सार्वमतच्या अंकात प्रसिध्द होताच काँग्रेस कार्यकर्ते (Congress Workers) खडबडून जागे झाले. कार्यकर्त्यांनी (workers) प्रतिमेची पुनर्स्थापना केली.
येथील ग्रामसचिवालयाच्या सभागृहाला काही वर्षांपूर्वी माजी मंत्री स्व. गोविंदराव आदिक सभागृह (Govindrao Adik Hall) असे नाव देण्यात आलेे आहे. त्यानंतर माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांचे निधन झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सभागृहात दोन्ही दिवंगत नेत्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. मात्र स्व. ससाणे यांची प्रतिमा काही दिवसांपासून गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
याबाबतचे वृत्त दै. सार्वमतच्या अंकात प्रसिध्द होताच काँग्रेस कार्यकर्ते खडबडून जागे झाले व सकाळी 9 वाजता एकत्र जमा होत सभागृहातील पूर्ववत फुलांचा हार घालून पुनर्स्थापीत करण्यात आली. प्रतिमेची पुनर्स्थापना झाली असली तरी प्रतिमा कोणी व का काढली?, राजकीय हेतूने काढण्यात आली की आणखी काही या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब बनकर, भास्करराव कोकणे, बाबासाहेब तनपुरे, भारत भवार, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, विलास दाभाडे, गणेश गायकवाड, नानासाहेब रणनवरे, महेंद्र संत, दादासाहेब कापसे, काका रणनवरे, बाबासाहेब दाभाडे, मोहन रणनवरे, गोटू दाभाडे, अशोक वेताळ, सुरेश बनकर आदी उपस्थित होते.
ग्रामसचिवालयातील स्व. जयंतराव ससाणे यांच्या गायब झालेल्या फोटोबाबत सरपंच अर्चना रणनवरे व उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले, स्व. ससाणे यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. सदर फोटोची पाठीमागच्या बाजुची क्लीप तुटल्यामुळे फोटो दुरुस्तीसाठी टाकला होता. त्याला विलंब झाला. कर्मचार्यांना फोटो लावण्याबाबत सूचना केल्या होत्या. या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत याची ग्वाही देतो. महाविकास आघाडीची ग्रामपंचायतीत सत्ता असल्याने आम्ही एकमुखी निर्णय घेऊन विकास योजना राबवत आहोत. त्यामुळे केवळ विलंब झाल्याने ही चूक झाली असल्याची कबुली ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली.