Monday, June 17, 2024
Homeनाशिकमिठाई विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी

मिठाई विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी

सातपूर | प्रतिनिधी Satpur

- Advertisement -

सणासुदीच्या दिवसात व पावसाळयाच्या दिवसात ग्राहकांना (Customer) सुरक्षित अन्नपदार्थ (Safe Food) मिळण्याच्या दृष्टीन प्रत्येकाने प्रयत्नशिल राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (Department of Food and Drug Administration) सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके (Joint Commissioner Chandrasekhar Salunke) यांनी केले.

अन्न औषध प्रशासनातर्फे नाशिक (Nashik) कार्यालयात अन्न सुरक्षा सप्ताह (Food Security Week) आयोजित करण्यात आला असून, त्या अंतर्गत मिष्ठान्न उत्पादक, मिठाई विक्रेते (Sweet Sellers), व फरसाण उत्पादकांसाठी मार्गदर्शक सूचना देणारी कार्यशाळा (Workshop) आयोजित करण्यात आली होती. दोन सत्रांमध्ये झालेल्या कार्यशाळेत प्रत्येक सत्रात सुमारे 40 व्यावसायिक हजर होते.

त्या कार्यशाळेचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके व सहायक आयुक्त गणेश परळीकर यांनी व्यवसायिकांना मार्गदर्शक सूचना देत नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले.

या कार्यशाळेत चित्रफितीद्वारे उत्पादक व मिठाई विक्रेते यांनी अन्नपदार्थाचा व्यवसाय करतांना घ्यावयाची काळजी व दक्षता तसेच अन्न सुरक्षा कायदा (Food Security Act) अंतर्गत असणार्‍या तरतुदींबाबत योगेश देशमुख व अमित रासकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी भगर असोसिएशन, नाशिकचे महेंद्र छोरीया (Mahendra Choriya) व मिठाई उत्पादक विक्रेते संघटनेचे दिपक चौधरी व त्यांचे सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. याबैठकीला अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. सूर्यवंशी, संदिप देवरे, दि.ज्ञा.तांबोळी व अ.र.दाभाडे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या