Friday, November 22, 2024
Homeनगरपोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा मुळा नदीत बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा मुळा नदीत बुडून मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी स्टेशन परिसरातील गावठाण येथील आनंद जॉन मखरे वय 45 हा इसम मुळानदी पात्रात पोहण्यासाठी गेला असता त्याला नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्या मुळानदी पात्रात बुडून मरण पावल्याची घटना शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. राहुरी स्टेशन परिसरातील गावठाण येथील आनंद मखरे हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या नातेवाईंका बरोबर मुळानदीकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते.

- Advertisement -

वातावरणात कमालीचा उकाडा असल्याने त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यानंतर त्यांनी अंगावरील कपडे काढून नदीपात्रात उडी मारून नदीच्या पलीकडी काठावर पोहत गेले. त्यानंतर पुन्हा परत येत असताना नदीपात्रात मध्यभागी आल्यानंतर त्यांचा पाण्यात दम तुटल्याने ते बुडाले. त्यांच्या समवेत असलेल्या नातेवाईकांनी आरडाओरड करून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते पाण्यात बुडाले. त्यानंतर राहुरी नगरपालिका आग्निशामक पथकाने व परिसरातील तरूणांनी नदीपात्रात रात्री उशीरापर्यंत शोध घेतला मात्र, ते मिळून आले नाही.

काल बारागाव नांदूर येथील पोहण्यात तरबेज असलेल्या काही तरूणांना पाचारण करून नदीपात्रात शोध सुरू केला. काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास राहुरी स्टेशन येथील रेल्वे पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. काल रात्री 7 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर राहुरी स्टेशन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. आनंद मखरे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन बहिणी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या