Saturday, September 28, 2024
Homeक्राईमतलवारी घेऊन फिरणारे तिघे पकडले

तलवारी घेऊन फिरणारे तिघे पकडले

एलसीबीची राहाता, नेवासा, श्रीरामपूरमध्ये कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी राहाता, नेवासा, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे (Rahata, Newasa, Shrirampur Police Station) हद्दीत कारवाई करून तीन तलवारी जप्त केल्या आहेत. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन अवैध अग्निशस्त्रे, घातक हत्यारे वापरणारे, वाहतुक, विक्री व बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (Special Inspector General of Police Dattatraya Karale) यांनी जिल्हा पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली असून त्यांनी राहाता, नेवासा व श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (11 जून) कारवाई केली आहे.

- Advertisement -

इंदीरानगर, पुणतांबा (ता. राहाता) येथील राहुल शिवाजी इंगळे (वय 24) याच्या ताब्यातून एक तलवार जप्त (Sword Seized) केली. त्याच्याविरूध्द राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा फाटा (ता. नेवासा) येथील शेखर दादासाहेब आहिरे (वय 31) याच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरूध्द नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रांजणखोल (ता. राहाता) येथील राधाकिसन गणपत जाधव (वय 45) याला श्रीरामपूर शहरात तलवारीसह पोलिसांनी पकडले. त्याच्याविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरात दोघांना पकडले
वारूळाचा मारूती, नालेगाव परिसरात हातात तलवार घेऊन फिरणार्‍याला तोफखाना पोलिसांनी पकडले. मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिज्जा (वय 31 रा. लोंढे वस्ती, कल्याण रस्ता) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. ख्रिस्तगल्लीत मित्राचा केक कापण्यासाठी तलवार घेऊन आलेल्या करण कृष्णा फसले (वय 30 रा. संगम चौक, ख्रिस्तगल्ली) याला कोतवाली पोलिसांनी पकडले. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या