Sunday, October 13, 2024
Homeनाशिकमराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांची रुई येथे प्रतिकात्मक अंत्ययात्रा

मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांची रुई येथे प्रतिकात्मक अंत्ययात्रा

शिरवाडे वाकद | Shirvade wakad

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. त्यांना राज्यभरातून प्रचंड समर्थन मिळत आहे. निफाड तालुक्यात हे आंदोलन तीव्र झाले असून रुई (ता. निफाड) येथे मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली…

- Advertisement -

शेतकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या रुई येथील चौकात सकल मराठा समाज एकत्र राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक तिरडी बनवून अंत्यसंस्कार करण्यात आले.

योगेश पोटे यांनी पाणी दिले तर अंकुश डोंगरे, भागवत तासकर, नवनाथ तासकर, अनिल खडांगळे, विलास गायकवाड, किरण रोटे, दिनकर खडांगळे, केदा रोटे, भागवत ठोंबरे, कैलास तासकर, ओमकार तासकर यांनी अग्निडाग दिला. लीलाबाई तासकर, हिराबाई कणसे, लीलाबाई रोटे, लंकाबाई तासकर, कविता गायकवाड, मनीषा रुकारी,मंगल जाधव यांनी शोक व्यक्त केला.

डॉ. सुजित गुंजाळ, डॉ.श्रीकांत आवारे, शिवा सुराशे, राजेंद्र बोरगुडे, अभिषेक घोटेकर, अंकुश तासकर, योगेश पोटे, ज्ञानेश्वर डोंगरे, सुनिल शिंदे, भागवत तासकर, केदारनाथ रोटे, अनिल खडांगळे, भागवत ठोंबरे, ओम तासकर, शमशुद्दीन काद्री, संजय पोटे, नवनाथ तासकर, भाऊसाहेब तासकर, महेश खडांगळे, विनायक गायकवाड, संदीप गायकवाड, अर्जुन घोटेकर, आण्णासाहेब गायकवाड, बापु रोटे, अमजद शेख, वसंत तासकर, गोरख तासकर, शुभम गवळी, रामेश्वर तासकर यांचेसह खेडलेझुंगे, नैताळे, देवगाव, शिरवाडे, वाकद, गुंजाळवाडी, डोंगरगाव, धारणगाव यासह विविध गावातील मराठा आंदोलक, महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

रुई येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लासलगावचे स.पो.नि. राहुल वाघ, पोलीस हवालदार संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर, सुजय बारगळ, मंगेश डोंगरे, मेजर देशमुख यांच्या पथकाने भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या