Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाउमेश यादवच्या जागी भारतीय कसोटी संघात टी नटराजनला संधी

उमेश यादवच्या जागी भारतीय कसोटी संघात टी नटराजनला संधी

दिल्ली । Delhi

भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. पुढील दोन्ही सामने तो खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले होते. तेव्हा पासून कोणत्या खेळाडूला यादवच्या जागी संधी मिळणार याची चर्चा सुरू होती.

- Advertisement -

जलद गोलंदाजी म्हणून टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर या दोघांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान टी नटराजनचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

बॉक्सिंग डे कसोटीच्या आधी, शार्दुल ठाकूरचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. ज्येष्ठ वेगवान गोलंदाज शमीच्या उजव्या हाताच्या मागील भागाला फ्रॅक्चर झाल्यांनतर ठाकूरचा समावेश करण्यात आला होता. नटराजनने आतापर्यंत नेटमध्ये प्रभावी गोलंदाजी केली असल्याचे कळत आहे परंतु तिसर्‍या कसोटीसाठी शार्दुलला संधी मिळेल असे प्राथमिक संकेत आहेत. नटराजनने यापूर्वी डाऊन अंडर आंतरराष्ट्रीय वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण केले, त्यामुळे आता त्याला कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधेही संधी मिळते की नाही हे पाहणे मजेदार ठरणार आहे. “शमी आणि उमेश यादव हे दोघेही जखमींच्या पुनर्वसनासाठी बेंगलोर येथील नॅशनल क्रिकेट अकादमी येथे जातील. रोहित शर्माने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे आणि आता तो मेलबर्नमध्ये भारतीय क्रिकेट संघात सामील झाले आहेत,” बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले.

सुधारित कसोटी संघ

अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साह (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या