Saturday, April 11, 2026
Homeक्रीडाT20 World Cup 2026 : भारत तिसर्‍यांदा विश्वविजेता

T20 World Cup 2026 : भारत तिसर्‍यांदा विश्वविजेता

न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव

अहमदाबाद |Ahmedabad

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये रविवारी 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी मैदानावर रंगलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे 2024 नंतर सलग दुसर्‍यांदा भारतीय संघ विश्वविजेता ठरला. तसेच विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद असलेला पहिला संघ ठरला.

- Advertisement -

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड ने क्लो मॅकाँची ऐवाजी जेकब डफीला संधी देण्यात आली. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ने 98 धावांची भागीदारी रचून भारतीय संघाला मजबूत सुरुवात करून दिली. अभिषेक शर्मा 52 धावांची खेळी साकारली. अभिषेक शर्मा तंबूत परतल्यानंतर ईशान किशन आणि संजू सॅमसन ने दुसर्‍या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी रचून संघाला 200 चा टप्पा पार करून दिला. 203 वर संजू सॅमसन 89 धावा काढून तंबूत परतला. ईशान किशन 54 सूर्य कुमार यादव 0 आणि हार्दिक पांड्या 18 धावा काढून बाद झाला. हार्दिक पांड्या तंबूत परतल्यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा ने 29 धावांची भागीदारी रचल्यामुळे भारताला 20 षटकांत 5 बाद 255 धावा काढता आल्या. न्यूझीलंड संघाकडून जिमी निशम ने 3 रचिन रवींद्र आणि मॅट हेन्री ने 1-1 गडी बाद केला.

विशेष म्हणजे संजू सॅमसन ने विश्वचषक स्पर्धेमध्ये नॉक आऊट सामन्यात सलग तिसर्‍यांदा अर्धशतक झळकावले. भारतीय संघाने विश्वचषक 2026 मध्ये 4 वेळा 250 चा टप्पा पार केला. तसेच भारतीय संघाने 7 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या न्यूझीलंड संघाच्या वतीने फीन अ‍ॅलन आणि टीम सॅफरिट ने फलंदाजी सुरू केली. पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी रचली फीन अ‍ॅलन 9 वर बाद झाला. अक्षर पटेल ने त्याला बाद केले. विशेष म्हणजे 2 धावांवर खेळत असताना शिवम दुबे ने अर्शदिपसिंगच्या गोलंदाजी वर झेल सोडला आणि त्याला जीवदान मिळाले. रचीन रवींद्र 1 वर बाद झाला. जसप्रीत बुमराह ने त्याला बाद केले. 33 वर न्यूझीलंड ने आपली दुसरी विकेट गमावली.

टीम सॅफरिट ला साथ देण्यासाठी मैदानावर आलेल्या ग्लेन फिलिप्सला अक्षर पटेल ने 5 वर त्रिफळाचित करत न्यूझीलंड संघाला तिसरा धक्का दिला. मार्क चॅपमन ने टीम सॅफरिट सोबत 24 धावांची भागीदारी रचली. हार्दिक पांड्या ने चॅपमनला 3 वर त्रिफळाचित केले. 70- न्यूझीलंड ने चौथी विकेट गमावली. 72 वर न्यूझीलंड ने पाचवी विकेट गमावली. वरुण चक्रवर्ती ने सॅफरिट ला 52 वर बाद केले. आणि भारतीय संघाला महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली.

डॅरेल मिचेल ने मिचेल सँटनेर सोबत 52 धावांची भागीदारी रचून संघाला 120 चा टप्पा पार करून दिला. डॅरेल मिचेल 17 धावा काढून तंबूत परतला. 124 वर न्यूझीलंड ने सहावी विकेट गमावली. मिचेल सँटनेर ने जिमी निशम सोबत थोडा वेळ प्रतिकार केला. पण न्यूझीलंड संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघाला प्रथमच पराभूत केले. न्यूझीलंड संघाला सर्वबाद 159 धावा काढता आल्या. न्यूझीलंड संघाकडून टीम सॅफरिट ने 52 डॅरेल मिचेल 17 मिचेल सँटनेर 43 धावा केल्या. भारतीय संघाकडून अक्षर पटेल ने 3 तर जसप्रीत बुमराह, ने 4 वरूण चक्रवर्ती हार्दिक पांड्या ने गडी बाद केला. टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये जसप्रीत बुमराह ने 40 गडी बाद करत पहिला क्रमांक पटकावला. तसेच विश्वचषक स्पर्धेतील भारताचा सर्वात मोठा विजय ठरला. भारतीय संघाने 96 धावांनी दणदणीत विजय संपादन केला.

ताज्या बातम्या

भाडेतत्वावरील घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबईमध्ये नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा...