Saturday, April 26, 2025
Homeनाशिक'ताल सुरन का मेल'; दसककर भगिनींचे सुरमयी गाणे लवकरच भेटीला

‘ताल सुरन का मेल’; दसककर भगिनींचे सुरमयी गाणे लवकरच भेटीला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गायन (Singing), वादन (Instrument playing) व नृत्य (Dance) या तिन्ही कलांचा समावेश असणाऱ्या विषयाला ‘संगीत’ असे म्हणतात” ही संगीताची परिभाषा आहे, याच संगीत जगतात काही नवनिर्मिती करण्याच्या उद्देशाने, या दिवाळीत (Upcoming Diwali) नाशिकच्या दसककर सिस्टर्स (Dasakkar Sisters) यांनी ‘ताल सुरन का मेल’ (Taal Suran ka mel) ही एक अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना त्यांच्या संकल्पनेतून साकारली आहे….

- Advertisement -

विविध अंगांनी, वैशिष्ट्यांनी नटलेल्या आणि सजलेल्या या कलाकृतीत शास्रीय संगीतातील (Classical music) आणि फ्युजन (Fusion) मधील जवळपास १० प्रकारांचे वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यात आले आहे. या रचनेत राग गावती, जोग, चारुकेशी, गौड मल्हार, श्याम कल्याण, मालकंस या रागांचा मिलाप असून ही रचना ताल रूपक वर आधारित आहे.

ज्या संगीत जगताने भारतीय रसिकमन समृद्ध केलं आहे अशा संगीत जगतात एक उत्तम आणि दर्जेदार कलाकृती अर्पण करण्याचा छोटासा प्रयत्न या गाण्याच्या माध्यमातून आम्ही केला आहे, अशी भावना दसककर भगिनींनी व्यक्त केली आहे.

अश्विनी दसककर भार्गवे, ईश्वरी दसककर, गौरी दसककर आणि सुरश्री दसककर या ‘दसककर सिस्टर्स’ च्या संकल्पनेतील “ताल सुरन का मेल” हे दृक्श्राव्य पद्धतीतील गाणे असून, त्यांच्यावरच चित्रित करण्यात आलेल्या या सुमधुर गाण्याला त्यांनी आपल्या गोड आवाजाने चार चांद लावले आहेत.

हे गाणं दसककर सिस्टर्स यांनीच शब्दबद्ध केले असून गाण्याला संगीत देखील त्यांनीच दिले आहे, या गाण्यासाठी तबला साथ सुजित काळे यांनी दिली असून गाण्याचे संगीत संयोजन ईश्वरी दसककर हिने केले आहे. गाण्याचे ध्वनीमुद्रण प्रशांत पंचभाई, श्रीरंग स्टुडीओ यांनी केले असून गाण्याचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अभिषेक कुलकर्णी यांनी केले आहे. तर गाण्याच्या चित्रीकरणासाठी सिटी सेंटरचे श्रीरंग सारडा यांचे सहकार्य लाभले आहे.

शुक्रवार, २९ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ९ वाजता हे गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...