Tuesday, November 26, 2024
Homeदेश विदेश‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती

‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1637 वर
नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून कोरोना संक्रमित रुग्णांची देशभरातील संख्या 1637 वर पोहोचली आहे. मागील चोवीस तासांत रुग्ण संख्येत 386 ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्र सरकारकडून बुधवारी देण्यात आली. दिल्लीतील तब्लीग-ए-जमातच्या कार्यक्रमामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचेही आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनाने आतापर्यंत 38 लोकांचा बळी घेतला असून 132 लोक उपचाराअंती बरे झाले आहेत, असे सांगून अग्रवाल पुढे म्हणाले, मागील चोवीस तासांत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली, याचे कारण म्हणजे जमातच्या लोकांनी देशभरात केलेला प्रवास व कोरोनाप्रती न घेतलेले गांभीर्य हे होय. जमातच्या 1800 लोकांना 9 रुग्णालये व क्वारंटाईन केंद्रांमध्ये पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या काही तासांत रुग्ण संख्येत झालेली वाढ ही राष्ट्रीय ट्रेंड दाखवित नाही, असा दावाही अग्रवाल यांनी केला. दरम्यान, रेल्वेने आपल्या 20 हजार डब्याचे रूपांतरण आयसोलेशन व क्वारंटाईन बेडमध्ये करणे सुरू केले आहे. सुमारे 3.2 लाखाची बेड क्षमता निर्माण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. प्रारंभिक टप्प्यात पाच हजार डब्यात काम सुरू करण्यात आले आहे.

टेस्टिंग किटस, औषधे, मास्क आदींची वाहतूक करण्यासाठी विशेष विमाने सुरू करण्यात आली आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची लगोलग प्राथमिक तपासणी करण्याचे निर्देश सरकारने याआधीच दिलेले आहेत.

रेल्वेमध्ये व्यवस्थाकोरोना रुग्णांसाठी रेल्वेमध्ये 3.2 लाख आयसोलेशन आणि क्वारंटाइन बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. ही व्यवस्था एकूण 5 हजार रेल्वे कोचमध्ये केली जाणार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

आयोजक मौलानासह 6 जणांवर गुन्हा
नवी दिल्ली – जगभर कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या तब्लीग-ए-जमातच्या कार्यक्रमाने दिल्लीच नव्हे तर संपूर्णं देश हादरला आहे. या कार्यक्रमामध्ये समावेश असलेल्या अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले असून काही जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, मौलाना साद हा 28 मार्चपासून पसार असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी 30 जण कोरोना बाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. या सर्व घडामोडींनंतर केंद्र आणि राज्य सरकारांची झोपच उडाली. कारण देशातल्या अनेक भागांमध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती आढळून येत आहेत. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेकजण सहभागी झाले होते. औरंगाबाद, अमरावती, पुणे यासह अनेक जिल्ह्यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते. तीन हजारांपेक्षा अधिक लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी 30 जण कोरोना बाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. या सर्व घडामोडींनंतर केंद्र आणि राज्य सरकारांची झोपच उडाली. कारण देशातल्या अनेक भागांमध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती आढळून येत आहेत. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ील अनेकजण सहभागी झाले होते. औरंगाबाद, अमरावती, पुणे यासह अनेक जिल्ह्यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेतला जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या