Saturday, May 25, 2024
Homeनगरतहसीलदारांची अवैध वाळू वाहतूक वाहनांवर कारवाई

तहसीलदारांची अवैध वाळू वाहतूक वाहनांवर कारवाई

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील मुर्शतपूर येथे अवैध गौणखनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन हायवा एक जेसीबी तहसीलदार संदिपकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने जप्त केले आहेत.

- Advertisement -

कोपरगांव तालुक्यातील मुर्शतपुर शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा अंदाजे 20 लाख रूपये हायवा प्रमाणे दोन हायवा 40 लाख रुपये आणि जेसीबी अंदाजे 20 लाख रुपये असे एकूण 60 लाख रुपयांची वाहने जप्त केली आहे.

तहसीलदार संदिपकुमार भोसले यांचे पथकात तलाठी गटकळ, शिपाई रामदास माळवदे, भाऊसाहेब माळी, कोतवाल साहेबराव रणशूर यांचा समावेश होता. अवैधरित्या गौनखनिज उपसून नेमका कोणत्या बांधकामावर जातो आहे. याची चौकशी केली जाणार असल्याचे तहसिलदार संदिपकुमार भोसले यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या