Saturday, July 27, 2024
Homeनगरताजनापूरच्या शनि मारूती मंदिरातील दानपेटी पळवली

ताजनापूरच्या शनि मारूती मंदिरातील दानपेटी पळवली

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील ताजनापूर येथील शनि मारुती मंदिरातील दानपेटी चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शनी मंदिर परिसरातील भाविकांसह तालुक्यातील जनतेचे श्रद्धास्थान आहे येथे शनिवार तसेच अमावस्या व इतर दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. 17 जुलैला सोमवतीअमावस्या असल्याने दर्शनासाठी आलेले भाविक मंदिरातील दानपेटीमध्ये सढळ हाताने दान करत असल्याचा अंदाज बांधून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी पळवून नेऊन शेजारी असलेल्या उसामध्ये नेऊन फोडली.

मंदिराचे पुजारी मुकुंद उत्तमराव मुळे हे नेहमीप्रमाणे शनि देवाच्या पूजेसाठी गेले असता त्यांना मंदिराच्या आवारात असलेली दानपेटी दिसली नाही त्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी केली. चोरीस गेलेल्या दानपेटीचा ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांना जवळच असलेल्या उसाच्या शेतामध्ये दानपेटी फोडलेल्या स्थितीत आढळून आली. दरम्यान पोलिसांना चोरीच्या घटनेबाबत माहिती कळविल्यानंतर परीविक्षाधिन पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मंदिराच्या परिसराची व फोडलेल्या दानपेटीची पाहणी केली.

ताजनापूर येथील शेतकरी आप्पासाहेब किसन वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शेवगाव शहरातील गजबजलेल्या परिसरात असलेल्या ऐतिहासिक महादेव मंदिरामधील दानपेटी मागील आठवड्यात फोडल्याची घटना घडली याबाबतही परिसरातील भाविक भक्तांनी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात सुरू असलेल्या चोर्‍यांच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नसल्याच्या नागरिकांतून तक्रारी आहेत याबाबत कसोशीने तपास करून घटनेचा तपास लावावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या