Friday, June 14, 2024
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायत प्रशासकाची कसोटी

टाकळीभान ग्रामपंचायत प्रशासकाची कसोटी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

- Advertisement -

करोना संसर्गाच्या वाढत्या फैलावामुळे सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक

म्हणून सरकारी कर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील राजकारणात मुरलेल्या टाकळीभान येथे निवड झालेले प्रशासकीय सरपंच पंचायत समितीचे विस्तार आधिकारी रावसाहेब अभंग यांची कामकाज करताना कसोटी लागणार आहे.

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 17 सदस्यांची 29 ऑगष्ट रोजी मुदत संपल्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रावसाहेब अभंग यांची प्रशासकीय सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज सोमवारी सकाळी 10 वाजता ते प्रत्यक्ष कार्यभार स्विकारणार आहेत.

प्रशासनातील सेवेचा त्यांचा दीर्घ अनुभव असला तरी राजकारणात चळवळीचे गाव म्हणून टाकळीभानचा जिल्ह्यात लौकिक आहे. गावची लोकसंख्या मोठी असल्याने गावचा विस्तारही मोठा झालेला आहे. मोठ्या विस्तारामुळे समस्याही तेवढ्याच आहेत. पाणीप्रश्न ही गावची महत्त्वाची समस्या आहे.

गेली कित्येक वर्षे सत्ताधारी गटाला त्यावर तोडगा काढता आलेला नाही. मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत व साधने उपलब्ध असतानाही गावकरी नेहमीच तहानलेले राहिले आहेत. त्यामुळे पाणीप्रश्न मुळासकट उपटून टाकण्यासाठी प्रशासकिय सरपंचांना पावले उचलावी लागतील. अंतर्गत रस्त्यांचीही मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. घरकुलांचाही प्रश्न प्रलंबीत आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमणाचा मुद्दा सध्या टाकळीभान येथे चांगलाच गाजत आसल्याने त्यावरही सुयोग्य तोडगा येत्या काही दिवसांत त्यांना काढावा लागणार आहे.

या प्रमुख कामाव्यतिरीक्त करोनामुळे कर वसुली बंद झाल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी झालेले आहे. त्याचा परीणाम कर्मचार्‍यांचे पगार उशिराने होत आहेत. बाजार भरत नसल्याने बाजाराचाही कर बंद असल्याने हा आर्थिक ताळमेळ घालण्यासाठीही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासकिय सरपंच यांची कसोटी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या