Friday, May 9, 2025
Homeक्राईमShrirampur : टाकळीभानमध्ये भरदिवसा दोन घरफोड्या

Shrirampur : टाकळीभानमध्ये भरदिवसा दोन घरफोड्या

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद बंगल्यांचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले 17 तोळे सोन्याचे दागिने व 58 हजार रुपये रक्कम असा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. काल 7 मे रोजी भर दुपारी झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

- Advertisement -

येथील घोगरगाव रस्त्यावर शेतकरी धनंजय उर्फ किरण विनायकराव धुमाळ यांची वस्ती असून ते आज काही कामानिमित्त गावात आले होते. तर त्यांची पत्नी व मुलगा हे घरापासून जवळच असलेले चुलते शिवाजी धुमाळ यांच्या घरी बंगल्याला कुलूप लावून गेले होते. तर शेतकरी ज्ञानेश्वर शहाराम कोकणे हे लग्नासाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दुपारी 2 ते 3 या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला.

या चोरट्यांनी धनंजय धुमाळ यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 15 तोळे सोन्याचे दागिने व 8 हजार रुपये तर ज्ञानेश्वर कोकणे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 2 तोळ्याचे दागिने व 50 हजार रुपये घेऊन पोबारा केला. या दोन ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 17 तोळे सोन्याचे दागिने व 58 हजार रुपये असा ऐवज चोरून नेला आहे. हे चोरटे पल्सर गाडीवर आले होते व हे चोरटे तीन होते अशी चर्चा नागरिकांत सुरू होती.

या घटनेची माहिती कळताच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पीएस आय सतीश डौले, सहायक फौजदार रविंद्र पवार, हवालदार बर्डे, वारे, पो.ना. अनिल शेंगाळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. व ठसे तज्ञ व श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या मदतीने पोलीस पुढील तपास करणार आहेत. याबाबात रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrigonda : शेतकर्‍यांना फसवून सिमेंट प्रकल्पासाठी जमीन खरेदी

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड महामार्गालगत भिमानदीच्या जवळ निमगावखलू हद्दीत दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड सिमेंट कंपनीसाठी या भागातील शेतकर्‍यांची आतापर्यंत सुमारे 39 एकर...