Tuesday, September 29, 2026
HomeनगरShrirampur : टाकळीभानमध्ये कट्टा दाखवून मॅनेजरला कोंडले

Shrirampur : टाकळीभानमध्ये कट्टा दाखवून मॅनेजरला कोंडले

सोन्याच्या चैनसह पावणे दोन लाखांचा ऐवज लुटला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील टाकळीभान येथील देशी दारू दुकानात मॅनेजरला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून खोलीत कोंडत रोख रक्कम व सोन्याची चैन असा एकूण 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश रामास्वामी दुलम (वय 44) हे टाकळीभान येथील आर. एन. कापसे यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानात गेल्या 20 वर्षांपासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्यांनी आपल्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवली होती. त्याच ड्रॉवरमध्ये दुकानातील 48 हजार रुपयांची रोख रक्कमही ठेवलेली होती.

- Advertisement -

दुपारी साडेचारच्या सुमारास आराम करत असताना इकबाल उर्फ सोन्या शेख हा त्यांच्या खोलीत आला. त्याने एक लाख रुपयांची खंडणी मागितली. दुलम यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने कंबरेला लावलेला गावठी कट्टा दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वतःवर अनेक गुन्हे असल्याचे सांगून दहशत निर्माण केली.

यानंतर आरोपीने दुलम यांना गोदामाच्या खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर दुकानातील काउंटरवर जाऊन तेथे बसलेल्या दिलीप येवले यांनाही धाक दाखवत गल्ल्यातील 48 हजार रुपयांची रोकड आणि ड्रॉवरमधील सोन्याची चैन बळजबरीने घेऊन तो पळून गेला. घटनेनंतर दुलम यांनी आरडाओरडा केल्यावर एका ग्राहकाने त्यांची सुटका केली. याप्रकरणी नरेश दुलम यांच्या फिर्यादीवरून इकबाल शेख उर्फ सोन्या (रा. टाकळीभान) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 2023 प्रमाणे 309 (1),308,327, 351 (2), 351 (3),3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी लुटीमुळे टाकळीभान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...