Sunday, May 19, 2024
Homeनगरटाकळीमियात गाव पातळीवर नवीन राजकीय समिकरणे

टाकळीमियात गाव पातळीवर नवीन राजकीय समिकरणे

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यात राजकियदृष्ट्या महत्वाची समजल्या जाणार्‍या टाकळीमिया ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 6 प्रभागांमधून 17 सदस्य व लोकनियुक्त सरपंच ओबीसी महिला असल्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

- Advertisement -

या निवडणुकीसाठी जनतेतून सरपंच निवडून द्यावयाचा असून त्यासाठी ओबीसी महिला आरक्षण निघाले असल्याने या पदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी मोर्चबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे गट-तट बाजूला ठेेऊन या निवडणुकीची समीकरणे बदलू लागली आहेत. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गावच्या विकासप्रश्नी एकत्र येऊन निवडणूक जिंकली होती. या गावात तनपुरे व विखे यांना मानणारे पारंपरीक दोन गट आहेत. मात्र स्थानिक पातळीवर सर्वजण एकत्र येऊन गावचे निर्णय करतात हे या गावचे वैशिष्ट्य आहे. परंतु या निवडणुकीत काही अंतर्गत मतभेद झाल्याने एकत्र न येता दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत. तनपुरे गटाचे सुभाष करपे, रवींद्र मोरे यांच्यासह विखे गटाचे शिवशंकर करपे, राजकीय गटा व्यतिरिक्त असलेले केशवराव शिंदे, राजेंद्र गायकवाड यांचा एक गट तर विखे यांना मानणारे शामराव निमसे, तनपुरे यांना मानणारे दत्तात्रय कवाणे, सुरेश निमसे, सुरेश भानुदास करपे यांचा एक गट असे दोनही गट निवडणुकीला सामोरे जात आहेत.

सरपंच पदासाठी करपे व मोरे यांच्या गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून महिला मंचच्या ज्योतीताई शिंदे, माजी सरपंच लिलाबाई गायकवाड या इच्छुक आहेत तसेच निमसे व कवाणे यांच्या गटाकडुन संभाव्य म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती मंगलताई निमसे, पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सुनीताताई निमसे या इच्छुक असल्याचे समजते. मात्र ऐनवेळेस दोन्ही गटाकडून प्रसंगानुरुप नवीन नावे समोर येऊ शकतात. हे सर्व जरी असले तरी या दोन्ही गटाव्यतिरिक्त अपक्ष म्हणून अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे. हे दोन्ही गट समोरासमोर येत असले तरी शेवटपर्यंत एकमेकांचे गैरसमज दूर करून पुन्हा एकत्र येण्याचे प्रयत्न होणार आहेत. परंतु ती शक्यता आता मावळू लागली असल्याचे चित्र असल्याने दोन्ही गटांत ही निवडणूक होणार आहे. मात्र सर्व चित्र 20 ऑक्टोबरनंतर स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या