दिक्षी। वार्ताहर Niphad /Dikshee
तालुक्यातील विकास सोसायट्यांचे नवीन झालेले तसेच पात्र व वारसाने झालेल्या सभासदांना तत्काळ कर्जवाटप करण्यात यावे अशा सूचना आ. बनकर ( MLA Dilip Bankar) यांनी जिल्हा बँक( District Bank) व सोसायटी पदाधिकार्यांना देत शासनाने जाहीर केलेल्या तीन लाख रुपयेपर्यंत शून्य टक्के व्याजदर योजनेचादेखील शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. दिलीप बनकर यांनी केले आहे.
तालुक्यातील विविध कार्यकारी सह. संस्थेच्या सभापती, उपसभापती, संस्था प्रतिनिधी, सचिव व नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक पिंगळे, प्रशासन अधिकारी धनवटे, सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर वाटपाडे, सहाय्यक विभागीय अधिकारी गरूड, बँक इन्स्पेक्टर, शाखाधिकारी यांच्या समवेत पिंपळगाव बसवंत(pimpalgaon Basvant) येथे झालेल्या बैठकीप्रसंगी आ. बनकर बोलत होते.
यावेळी आ. बनकर यांनी सोसायटींच्या अडचणी जाणून घेत नवीन, पात्र, वारसाने झालेल्या सभासदांना कर्जवाटप करणे तसेच शासनाने दिलेल्या तिन्ही कर्जमाफीत वंचित राहिलेल्या सभासदांना कर्जमाफीचा लाभ देणे, मध्यम मुदत कर्जवाटप व्हावे. बँकेने थकलेल्या सभासदांचे व्याज वसूल केले परंतु सोसायटीस्तरावर त्या थकित सभासदांचे व्याज वसूल झालेले नसून याबाबत बँकेने सहकार्य करावे.
बँकेमार्फत मध्यंतरीच्या काळात कर्जपुरवठा(Loan) होत नव्हता असे चांगले प्रामाणिक, कष्टकरी सभासद इतर बँकेत गेले. सोसायटीची कर्जप्रक्रिया सोपी व सोयीची असून त्यांना पुन्हा आपल्याकडून कर्ज घ्यायचे आहेत याकरता त्यांनाही कर्जपुरवठा करावा. एकाच कुटुंबातील सदस्याचे कर्ज थकले व त्याच कुटुंबातील सदस्याचे नावे बँकेत पैसे असतील तर ते कर्ज खाती वर्ग करावे जेणेकरून वसुली होईल आदी सूचना उपस्थित प्रतिनिधींनी मांडल्या. बँकेने मागील काळात रोखीने केलेल्या कर्जवाटपाची रोखीने कर्जवसुली द्यावी.
जे शेतकरी सभासद सन 2021-2022 या वर्षात तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतील त्यांना महाविकास आघाडी शासनाने जाहीर केलेल्या शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती पिंगळे यांनी दिली. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे 920 कोटी रुपये महाविकास आघाडी शासनाने उपलब्ध करून दिले. त्यामुळे काही प्रमाणात बँक सुरळीत सुरू झाली. कर्जवाटप करता आले याबद्दल शेतकर्यांनी शासनाचे आभार मानले. याप्रसंगी नंदू सांगळे, दत्तात्रय डुकरे, साहेबराव मोरे, माधव ढोमसे, बाबासाहेब शिंदे, बापू गडाख, संपत डुंबरे, सदाशिव खेलुकर आदींसह तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, सचिव उपस्थित होते.