नवापूर Navapur । श.प्र.-
राज्यातील वस्त्रोद्योगाला उर्जितावस्थेत textile industry आणण्यासाठी उपाययोजनांची measures अंमलबजावणी करावी, यासाठी नवापूर टेक्सटाईल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे Navapur Textile Industries Association खा.डॉ.हिना गावीत Dr. Hina Gavit यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, नवापूर शहर हे टेक्सटाईल सिटी म्हणून ओळखले जाते. याठिकाणी वस्त्रोद्योग व त्याउद्योगाशी निगडीत उद्योगांची संख्या जास्त असून, या उद्योगाला उर्जितावस्था आणणे गरजेचे आहे. राज्यातील वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था आणण्याकरीता काही बाबी महत्वाच्या आहेत. गेल्या वर्षाच्या (2020-2021) अर्थसंकल्पात राज्यातील 27 एचपी वरील यंत्रमागधारकांना 75 पैसे प्रति युनिटची अतिरिक्त सवलत जाहिर केली होती.
त्याची आजअखेर अंमलबजावणी झालेली नसून त्याची त्वरीत अंमलबजावणी व्हावी तसेच राज्यातील साधे यंत्रमागधारकांना 5 टक्के व्याज अनुदान देण्यात यावे, ही सवलत मागच्या भाजप-सेना युतीच्या सरकारने मंजूर केलेली योजना होती. परंतु व्याजाचे अनुदान देण्याकरीता काही किचकट अटी लादण्यात आल्या होत्या.
त्यामुळे राज्यातील दोन ते पाच टक्के यंत्रमागधारकांना या योजनेचा लाभ मिळाला. इतर 95 टक्के पेक्षाही जास्त यंत्रमागधारकांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. किंवा त्यांना त्याचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या अटी थोडया सुटसुटीत आणि सोप्या करुन त्याच्यात काही जाचक अटी आहेत त्या शिथील करण्यात याव्यात.
महाराष्ट्र राज्यातील यंत्रमागधारकांना विज कनेक्शन घेतांना पूर्वी मल्टी पार्टी या संकल्पनेच्या अंतर्गत विज कनेक्शन दिले जात होते. परंतु काही कारणास्तव महावितरणने ही अट रद्द केली किंवा ही सवलत रद्द केली. त्यामुळे राज्यातील बर्याच प्रमाणात साध्या यंत्रमागधारकांना याचा फटका बसू लागला.
त्यामुळे मल्टी पार्टी ही योजना त्वरीत जुन्या ग्राहकाबरोबर नवीन ग्राहकांना देखील त्याचा फायदा मिळावा असा निर्णय करणे गरजेचे आहे.
निवेदनावर नवापूर टेक्सटाईल इंडस्ट्रीज असोसिएशन तालुका अध्यक्ष सी.ए नरेंद्र अग्रवाल,अध्यक्ष ईश्वर पाटील,धर्मेश अग्रवाल,धनजी गोटी आदी सदस्यांच्या सह्या आहे.