Saturday, May 4, 2024
Homeनगरहल्लेखोरांवर कठोर कारवाई करा : डॉक्टर एसपींच्या भेटीला

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा : डॉक्टर एसपींच्या भेटीला

करोनाबाधिताच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सिटी केअर हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स आज शुक्रवारी एसपींच्या भेटीला पोहचले. डॉ. राहुल ठोकळ हे जखमी असतानाही शिष्टमंडळात सहभागी झाले. आरोपींवर कडक कारवाई करावी असे निवेदन संचालक डॉ. संदीप सुराणा यांच्या नेतृत्वाखाली एसपींना दिले. मारहाणीत डॉ. ठोकळ यांच्या हाताला तीस टाके पडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या