Sunday, May 26, 2024
Homeनाशिकद्राक्ष उत्पादकांना फसवणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाई करा

द्राक्ष उत्पादकांना फसवणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाई करा

पिंपळगाव बसवंत। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर ( MLA Dilip Bankar)यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

- Advertisement -

सध्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षहंगाम सुरू आहे. द्राक्ष छाटणीपासून तर द्राक्ष विक्री होऊन पैसे हातात मिळेपर्यंत उत्पादकांना कसब पणाला लावावे लागते. बेमोसमी पाऊस, कडाक्याची थंडी, भरमसाठ ऊन अशा निसर्गाच्या लहरीपणासोबत दोन हात करीत विविध बँकांचे कर्ज काढत पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळून द्राक्षबाग पिकवली जाते. तो माल खरेदीसाठी परराज्यातून येणार्‍या व्यापार्‍यांची संख्या मोठी आहे.

मात्र, गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात दरवर्षी द्राक्षमालाचे पैसे न देता कोट्यवधींना गंडा घालत परप्रांतीय व्यापारी पळून जातात. प्रत्येकवर्षी निफाड, पिंपळगाव, उगाव, चांदवड, नाशिक, दिंडोरी येथील द्राक्ष बागायतदारांना व्यापार्‍यांनी सुमारे कोट्यवधींचा गंडा घातला होता. शेतकर्‍यांनी गुन्हे दाखल केले आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी बाजार समिती राज्य शासनाच्या पणन मंडळातर्फे व्यापार्‍यांवर नियंत्रण असावे, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांकडून वारंवार होत आहे.

वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या द्राक्षमालाचे पैसे न मिळाल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी होते. र् करून हातात पैसे मिळत नसल्याने द्राक्षशेती अवघड वळणार आली आहे. त्यासाठी द्राक्षमालाच्या व्यवहाराला कायद्याच्या कचाट्यात आणून द्राक्षमालाच्या पैशांची हमी मिळण्याची नितांत गरज निर्माण झाली आह, असे बनकर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या