Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रNashik News : तलाठी परीक्षा गैरप्रकार प्रकरण; संशयित निघाला मास्टरमाईंड, चौकशीसाठी पथक...

Nashik News : तलाठी परीक्षा गैरप्रकार प्रकरण; संशयित निघाला मास्टरमाईंड, चौकशीसाठी पथक रवाना

नाशिक | Nashik

शहरातील दिंडोरी रोडवरील (Dindori Road) वेबईझी इन्फोटेक याठिकाणी गुरूवार (दि. १७) रोजी तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti) ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी (Police) तातडीने पाऊले उचलत परीक्षा केंद्राबाहेरून संशयित गणेश श्यामसिंग गुसिंगे (वय-२८, रा. मुक्काम सूजारपूरवाडी पोस्ट परसोडा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यास ताब्यात घेतले होते…

- Advertisement -

यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता नाशिक पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी आणि गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून रवाना केले आहे. या पथकात एसीपी, चार वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण १० जणांचा समावेश आहे.

Maharashtra Politics : “सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात मुख्य खुर्ची बदलणार”; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा गुरुवार (दि. १७) पासून सुरू झाली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) हद्दीत असलेल्या वेबईझी इन्फोटेक या ठिकाणी तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा सुरू असतांना परीक्षा केंद्राबाहेरून संशयित गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) याला एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि श्रवणयंत्र असे साहित्य वावरतांना ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील काही प्रश्नांचे फोटो देखील मिळून आले होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Trimbakeshwar News : पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घेतला त्र्यंबकेश्वर येथील श्रावणमासाच्या नियोजनाचा आढावा

त्यानंतर संशयित गणेश गुसिंगे यास शुक्रवार (ता.१८) रोजी न्यायालयात (Court) हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच यानंतर आता पोलीस आयुक्तांनी या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले असून हे पथक संशयित गणेश गुसिंगे यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) गावी जाऊन तपास करण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी कोण कोण साथीदार आहेत? हे रॅकेट कार्यरत आहे का? आधुनिक साहित्य वापरत हायटेक कॉपीचे प्रशिक्षण दिले जाते का? यासह आणखी काही गोष्टींचा या पथकाकडून तपास केला जाऊ शकतो.

‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने फडणवीस अस्वस्थ; ठाकरे गटाकडून घणाघात

दरम्यान, संशयित गणेश गुसिंगे याने २०१९ मधील म्हाडा भरती आणि २०२१ च्या पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा (Mhada and Pimpri Chinchwad Bharti) पेपर फोडल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी त्याच्यावर २०२१ साली गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी फरार असलेल्या या आरोपीला दोन वर्षे अटक का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सुंभ जळाला तरी पिळ कायम; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

- Advertisment -

ताज्या बातम्या