Friday, May 31, 2024
Homeनगरकोतवालाने तलाठ्यासाठी घेतली लाच

कोतवालाने तलाठ्यासाठी घेतली लाच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील शेंडी (Shendi) तलाठी कार्यालयातील कोतवाल याला लाच (Bribe) घेताना नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याचे नाव समजू शकले नाही. मात्र त्याने सदरची लाच (Bribe) तलाठ्यासाठी (Talathi) घेतली असून सदर लाचेची रक्कम 50 हजार रुपये असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिली.

- Advertisement -

नोंद लावण्यासाठी एका व्यक्तीकडे कोतवाल याने लाचेची (Bribe) मागणी केली होती. तशी तक्रार त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. सोमवारी (दि. 11) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या लाच मागणी व पडताळणी दरम्यान कोतवाल याला रंगेहाथ पकडले. त्याने तलाठी यांच्या साठी लाच घेतली असून त्या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक लोखंडे यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या