Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रTalathi Exam Schedule : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार...

Talathi Exam Schedule : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा सुरू

मुंबई | Mumbai

गेल्या वर्ष भरापासून राज्यातील स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील भरतीची प्रतिक्षा करत होते. त्यानंतर आता अनेक पदासांठी भरती प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी भरती जाहिर करण्यात आली होती. त्याला मध्यमंती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता अखेर तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत.

- Advertisement -

ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

परीक्षेची तारीख अन् टप्पे

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट

  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...