Thursday, September 19, 2024
Homeनगरतळेगाव दिघे येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

तळेगाव दिघे येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्युत उपकेंद्र परिसरात अंदाजे 45 वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. रविवारी (दि. 12) 11 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तळेगाव दिघे गावानजीक असलेल्या विद्युत उपकेंद्र परिसरात श्रीरंग रेवजी दिघे यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर इस्माने केवळ अंडरवेअर परिधान केलेली होती. नजीकच त्याची विजार आणि सदरा आढळून आला.

याबाबत पोलीस पाटील दत्तू इल्हे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पालवे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रसंगी युवक कार्यकर्ते स्वप्नील दिघे, सार्थक कांदळकर, श्रीपाद दिघे यांनी पोलिसांना साहाय्य केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर व्यक्ती कोण कुठली? याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या