तळोदा – शहर प्रतिनिधी nandurbar
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत कधी नव्हे ते अघटीत घडले, काल दिनांक सात रोजी होळीच्या (holi) दिवशी दुपारी चार वाजेच्या सुमारास तळोदा तालुक्यात तुफान वादळ वारा व पावसाने हजेरी लावली यामुळे तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे,यात प्रामुख्याने गहू केळी आदी पिकांच्या समावेश आहे तळोदा शहराच्या उत्तरेस असलेल्या नवागाव व चिनोदा शिवारात तुफान पाऊस झाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे पीक जे येत्या पंधरा दिवसात काढणीवर होते ते गव्हाचे पीक खाली जमिनीवर पडून पिकाचे नुकसान झाले आहे यामुळे खाली पडलेल्या गव्हाला उंदीर व घुस यांच्या त्रास होऊन पिकाचे नुकसान होणार आहे व शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने लावलेल्या पिकाला मातीमोल भाव मिळणार!
# Photo काठी संस्थानची वैशिष्ट्यपूर्ण राजवाडी होळी
परिसरातील शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावर युद्ध पातळीवर पंचनामे होऊन तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तळोदा तालुक्यातील शेतकरी वर्ग आधीच विविध प्रकारच्या बँका सहकारी सोसायट्यांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे मार्च महिना अखेर पीक उत्पादनासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करावयाची 31 मार्च ही शेवटची मुदत असताना पिकाचे उत्पन्न काढून सदरचे कर्ज परतफेड करणाऱ्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. आधीच सावकारी संकटात असलेल्या शेतकऱ्यावर आसमानी संकट देखील अचानक आल्याने शेतकरी हातबल झाला आहे, तरी शासन स्तरावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.