Wednesday, April 2, 2025
Homeनंदुरबारकोराई येथे पावणे चार लाखाची अवैध दारु जप्त

कोराई येथे पावणे चार लाखाची अवैध दारु जप्त

आमलाड, ता.तळोदा – 

अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथे घरातून 3 लाख 83 हजार रुपये किमतीचा अवैध दारुसाठा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.18 डिसेंबर रोजी अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथे एक इसम विदेशी बनावटीची दारु विना परवाना कब्जात बाळगुन तिची चोरटी विक्री करीत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथे गोटपाडा रस्त्यावर असलेल्या राजु पारत्या पाडवी याच्या घराच्या आजु-बाजुच्या परीसरात वेशांतर करुन सापळा रचला. परंतु पोलीस येण्याआधीच आरोपी घराला कुलुप लावून पळून गेला.

त्याच्या घराच्या मागील दरवाज्याच्या फटीतून आत बघितले असता तिथे पथकास पांढर्‍या रंगाचे खोके दिसून आले. पथकातील कर्मचार्‍यांनी त्या खोलीचे कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश केला. खापर येथील अवैध विदेशी दारु विक्रेता मनोज मगन चौधरी हा तेथे आला, व पोलीसांना पाहुन पळुन गेला.

राजू पारत्या पाडवी याच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या खोलीतून 3 लाख 83 हजार 520 रुपये किंमतीची बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे 4512 काचेच्या 180. एम.एल.च्या बाटल्या मिळून आल्या.

त्या जप्त करुन राजु पारत्या पाडवी रा. कोराई ता.अक्कलकुवा मुळ रा. ओहवाकुवा ता. अक्कलकुवा, मनोज मगन चौधरी रा.खापर ता.अक्कलकुवा यांच्याविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, पोना सुनिल पाडवी, बापु बागुल, युवराज चव्हाण, मनोज नाईक, गणेश मराठे यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Amendment Bill : ‘वक्फ’ म्हणजे काय? विधेयकात नेमकं काय आहे?...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू (Kiran Rijiju) यांनी लोकसभेत...