Wednesday, November 11, 2026
Homeक्राईमRahuri : तांभेरेत रस्त्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Rahuri : तांभेरेत रस्त्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

परस्परविरोधी फिर्यादींवरुन 21 जणांवर गुन्हे दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे रस्त्याच्या जुन्या वादातून दोन गटांत शिवीगाळ, दमदाटी व तुंबळ हाणामारी झाल्याची घटना दि. 16 सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून एकूण 21 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हाणामारीत पाचजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

पहिल्या फिर्यादीनुसार, नानासाहेब पारुबाळ मुसमाडे (वय 67, रा. तांभेरे) हे रात्री गणपतीची आरती करून काही जणांसह बसले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. तुम्ही आमचा रस्ता का बंद केला, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर रस्त्याच्या जुन्या वादातून लाकडी काठी, दगड, कुर्‍हाड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच डंपरखाली घालून मारून टाकू, अशी धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या फिर्यादीवरून शुभम शिवाजी मुसमाडे, ऋषिकेश लक्ष्मण मुसमाडे, अक्षय गोरक्ष मुसमाडे, शुभम गोरक्ष मुसमाडे, गोरक्ष रावसाहेब मुसमाडे, वैभव कैलास गागरे, गौरव कैलास गागरे, रोहित कचरू मुसमाडे (सर्व रा. तांभेरे) तसेच शुभम लहानू सांगळे व संकेत खेडेकर (रा. तांदुळनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. 1065/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 115 (2), 118 (1), 190, 191 (1), 191 (3), 351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसर्‍या गटातील मंगल गोरक्षनाथ मुसमाडे (वय 45, रा. तांभेरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या रात्री शेतातील मोटार सुरू करण्यासाठी जात असताना पंढरीनाथ मुसमाडे व शुभम मुसमाडे यांनी तुम्ही या रस्त्याने जायचे नाही, असे सांगितले. मंगल मुसमाडे यांनी हा सार्वजनिक रस्ता असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. त्यानंतर घरातील मंडळींसह शेताकडे जात असताना आरोपींनी पुन्हा रस्ता अडवून शिवीगाळ केली. तसेच लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आणि पुन्हा या रस्त्याने आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून पंढरीनाथ भानुदास मुसमाडे, शुभम पंढरीनाथ मुसमाडे, राहुल बाबासाहेब मुसमाडे, नानासाहेब पारुबाळ मुसमाडे, दीपक नानासाहेब मुसमाडे, लक्ष्मण नानासाहेब मुसमाडे, अभिजीत पंढरीनाथ मुसमाडे, संजय दत्तात्रय मुसमाडे, आदित्य संजय मुसमाडे व भाउसाहेब दत्तात्रय मुसमाडे (सर्व रा. तांभेरे) यांच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. 1068/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 118 (1), 115 (2), 351 (2), 352, 189 (2), 190, 191 (1), 191 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेत संजय दत्तात्रय मुसमाडे, पंढरीनाथ भानुदास मुसमाडे, आदित्य संजय मुसमाडे, शुभम पंढरीनाथ मुसमाडे व अभिजीत पंढरीनाथ मुसमाडे हे पाचजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...