Friday, April 25, 2025
HomeमनोरंजनPauline Jessica : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला

Pauline Jessica : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला

दिल्ली | Delhi

फिल्म कलाविश्वातून एक दु:खद बातमी पुढे येत आहे. दीपा (Deepa aka Pauline Jessica) नावाने प्रसिद्ध असलेली २९ वर्षीय तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका (Tamil Actress Deepa aka Pauline Jessica) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह चेन्नईमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये पॉलीनने आयुष्यभर कोणावर तरी प्रेम करत राहील… असं लिहिलं आहे. तर तिच्या मृत्यूचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. पॉलीनच्या चिठ्ठीत कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

पॉलीन जेसिका ही मूळची आंध्र प्रदेशची आहे. पॉलीनने अनेक तामिळ सिनेमामध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. फार कमी कालावधीत तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती.

पॉलिन जेसिकानं वैधा (Vaidha) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. त्याचबरोबर पॉलीन जेसिकानं तमिळ चित्रपट आणि सिरीयलमध्ये काम केलं आहे. दीपा मायस्किन दिग्दर्शित ‘थुप्परीवलन’ या हिट चित्रपटात तिनं काम केलं होतं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...