Wednesday, June 19, 2024
Homeमनोरंजनधक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने वयाच्या १६ व्या वर्षी संपवलं जीवन, राहत्या घरात...

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने वयाच्या १६ व्या वर्षी संपवलं जीवन, राहत्या घरात घेतला गळफास

दिल्ली | Delhi

- Advertisement -

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक बातमी आली आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतकार व अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने आज १९ सप्टेंबरच्या पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या मुलीने आपल्या चेन्नईतील राहत्या घरी गळफास घेतला आहे. पहाटे ३ वाजता विजय यांची मुलगी घरामध्ये मृतावस्थेत आढळली. लगेचच तिला कुटुंबीयांकडून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयची मुलगी चेन्नईतल्या एका प्रसिद्ध शाळेत शिक्षण घेत होती. रिपोर्ट्सनुसार, ती तणावाखाली होती आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते. यासंदर्भात एका वृत्त वाहिनीने वृत्त दिलं आहे.

विजय यांची मुलगी इयत्ता १२वीत शिकत होती. १२ वीची विद्यार्थिनी असलेली मीरा तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला आहे. कोणलाही या घटनेवर अद्याप विश्वास बसत नाही. इतक्या लहान वयात अभिनेत्याच्या लेकीने आयुष्याचा शेवट का केला असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक लोक विजय यांच्या घरी पोहोचत आहेत. अभिनेते विजय यांच्या काही जवळच्या लोकांनी सोशल मीडियावरुन या घटनेची माहिती देत दु:ख व्यक्त केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या