Sunday, September 27, 2026
HomeराजकीयTamil Nadu Election Result : तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांना जोरदार धक्का! थलापती...

Tamil Nadu Election Result : तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांना जोरदार धक्का! थलापती विजयची ‘एंट्री’ सुपरहीट, सुरुवातीच्या कलानूसार TVK आघाडीवर

चेन्नई । Chennai

दक्षिणेतील राजकारण आणि चित्रपटसृष्टी यांचे नाते जुनेच आहे, मात्र आज तामिळनाडू विधानसभेच्या मतमोजणीत एका नव्या पर्वाचा उदय होताना दिसत आहे. सुपरस्टार विजय थलापती याच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये विजय थलापती यांच्या पक्षाने ७५ जागांवर मुसंडी मारत सर्वांनाच थक्क केले आहे.

- Advertisement -

देशातील आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम आज निकालाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. तामिळनाडूमध्ये सध्या एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमके (DMK) पक्षाची सत्ता आहे. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता राखण्याचा प्रयत्न केला खरा, पण ‘थलापती’च्या करिष्म्यापुढे त्यांची गाडी ६७ जागांवर अडकलेली दिसत आहे. दुसरीकडे एआयडिएमके (AIADMK) ३५ जागांवर आघाडीवर आहे.

तामिळनाडूत सत्ता राखण्यासाठी डीएमकेने पूर्ण ताकद लावली होती, मात्र अभिनेता विजयच्या पक्षाने थेट सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षाच्या व्होट बँकेला खिंडार पाडले आहे. जर हे कल निकालात बदलले, तर तामिळनाडूच्या राजकारणात विजय हा नवा ‘किंगमेकर’ किंवा ‘किंग’ ठरण्याची दाट शक्यता आहे. अवघ्या देशाचे लक्ष आता चेन्नईतील अंतिम निकालाकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

ज्ञानेश कुमार हे ‘देशाचे दुश्मन’, आता ते…; संजय राऊतांचा हल्लाबोल

0
मुंबई । Mumbai निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेवरून पेटलेला राजकीय वणवा दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनीच मुख्य निवडणूक आयुक्त...