Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! आरोग्य विभागात 'इतक्या' पदांची भरती

मोठी बातमी! आरोग्य विभागात ‘इतक्या’ पदांची भरती

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

पेपरफुटी आणि अनेकविध घोळांमुळे गेली तीन वर्ष रखडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून १० हजार ९४९ पदे भरली जाणार आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सोमवारी येथे दिली…

RIL AGM 2023 : मुकेश अंबानींची मोठी घोषणा! रिलायन्स समूहाची जबाबदारी नव्या पिढीकडे; नीता अंबानींचा राजीनामा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२१ मध्ये आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता तानाजी सावंत यांनी या भरतीसाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चंद्रानंतर आता सूर्य मिशन! आदित्य-L1 या तारखेला झेपावणार; इस्रोने दिली माहिती

- Advertisment -

ताज्या बातम्या