Thursday, May 22, 2025
Homeनगरमळीच्या टँकरच्या चाकाखाली आल्याने तरुण ठार

मळीच्या टँकरच्या चाकाखाली आल्याने तरुण ठार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील सय्यद बाबा चौकात पान घेण्यासाठी जात असलेल्या तरुणास मळीच्या टँकरने धडक दिली. त्यात चितळी येथील तरुणजागीच ठार झाला.

काल शनिवरी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एमएच 17 एजे 780 या क्रमांकाचा टाटा मांझा या गाडीतून दोघेजण सय्यद बाबा चौकातून जात होते. त्यांनी हॉटेल मिनार जवळ आपली कार उभी केली व त्यातील एक तरूण पान घेण्यासाठी कारमधून खाली उतरला.

त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एमएच 17 बीवाय 9037 या मळीच्या टँकरने धडक त्याला धडक दिली. त्यात हा तरुण टँकरच्या चाकाखाली सापडल्याने त्याच्या शरिराचा चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर टँकर चालक थेट तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला. या आपघातात ठार झालेला तरुण श्रीरामपूर येथील एका पोलिस कर्मचार्‍याचा नातेवाईक होता असे समजते.

रात्री उशिरा पोलिसांनी तेथे येवून पंचनामा करून मृत्यदेह रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : शिबलापूर येथील कृषी सेवा केंद्र चोरी प्रकरणी तिघांना...

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील पिंप्रीलौकी फाटा शिबलापूर (Shilapur) येथील कृषी सेवा केंद्राच्या (Agricultural Service Centre Theft) गुन्ह्यातील 3 आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB...